डाेणगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सध्या कोविड लसीकरण सुरू आहे. जनुना येेथे ९ मे राेजी लसीकरण शिबिर आयाेजित करण्यात आले हाेते. मात्र, एकाही लाभार्थ्याने लस घेतली नाही. या गावातील लाेकांचा लसीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमाेल गवई यांनी गावात ९ जुलै राेजी लसीचा दुसरा डाेस घेतला.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसनही केले. त्यामुळे ग्रामस्थांची भीती दूर झाली. शुक्रवारी गावात लसीकरण शंभर टक्के यशस्वी पार पडले. या लसीकरणाकरिता गावचे सरपंच शिवाजी गवई, डॉ.नलिनी तायडे, जी.के. काळदाते, बळी, काळे, वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका, तलाठी यांनी मोलाचे सहकार्य केले.
090721\new doc 2021-07-09 12.57.18_1.jpg
लस घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल गवई