लोणार हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे लोणारला जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता म्हणजे कारेगाव ते लोणार हा आहे. या रस्त्याला कमीत- कमी सात ते आठ गावे जोडलेली आहेत. सोमठाणा, महारचिकणा, कोणाटी, देऊळगाव कोळ, कंडारी, भंडारी, खळेगाव आणि कारेगाव इत्यादी गावे ही या रस्त्यालगत जोडलेली आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यामध्ये पाणी साचलेले आहे. त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनधारक हे त्या खड्ड्यामध्ये पडत आहेत. या खड्ड्यामध्ये वारंवार अपघात होत आहेत. चालकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारेगाव ग्रामपंचायतीने २०२० या वर्षाला बांधकाम विभागाला या रस्त्याविषयी एक निवेदन सुद्धा दिलेले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तरीसुद्धा या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कारेगाववासीयांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बांधकाम विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.
कारेगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:23 AM