चिखली : दुकानउघडताना आपल्याजवळील चांदीचे दागिने असलेली पिशवी दुकानातीलकाऊंटरवर ठेवणे एका सराफा व्यावसायिकास महागात पडले. काऊंटरवर ठेवलेलीचांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात महिलेने अलगद लंपास केल्याची घटना २३आॅक्टोबर रोजी सकाळी चिखलीत घडली. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी महिलादुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे.चिखली शहरातील सराफा व्यावसायीक भगवान पितांबर वाळेकर यांनी पोलिसातदिलेल्या तक्रारीत नमुद केले की, २३ आॅक्टोबर रोजी नेहमी प्रमाणे आपलेडीपी रोडवर असलेले श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाचे दुकान उघडले. त्यानंतरकाऊंटरवर आठ किलो चांदीच्या दागिन्यांची पिशवी ठेवली. त्यामध्ये तोरड्या,पाटल्या यासह इतर अनेक दागिन्याचा समावेश होता. साफ सफाई करण्यासाठीदुकानाच्या आतील बाजूस असलेली झाडणी आणण्यासाठी गेलो असता काऊंटरवरठेवलेली दागिन्यांची पिशवी लंपास झालेली आढळून आली. त्यानंतर आसपासच्यादुकानदाराकडे चौकशी केली असता दुकानाच्या आसपास काही अज्ञात महिलासंशयास्पदरीत्या फिरताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनीपरिसरातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक अनोळखी महिलासदर पिशवी घेऊन जातांना दिसून आली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातमहिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुखयांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गवारगुरु पीएसआय गव्हाणे हे करीत आहेत.काही दिवसापूर्वी शहरातील एका सोनारास दीड लाख रुपयाचा गंडा घातला होता.या घटनेची शाई वाळत नाही तोच आज ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे सराफाव्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आठ किलो चांदी असलेली पिशवी महिलेने केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:47 PM
चिखली : दुकानउघडताना आपल्याजवळील चांदीचे दागिने असलेली पिशवी दुकानातीलकाऊंटरवर ठेवणे एका सराफा व्यावसायिकास महागात पडले. काऊंटरवर ठेवलेलीचांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात महिलेने अलगद लंपास केल्याची घटना २३आॅक्टोबर रोजी सकाळी चिखलीत घडली. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी महिलादुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे.चिखली शहरातील सराफा व्यावसायीक भगवान पितांबर वाळेकर यांनी पोलिसातदिलेल्या ...
ठळक मुद्देचिखली येथे संशयित महिला सीसीटीव्हीत कैद