लोकमत न्यूज नेटवर्कधाड : रूईखेड मायंबा येथील एका शेतकर्याच्या शेतातील गोठय़ातून बैलजोडी चोरून नेल्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून येथील पती, पत्नी व मुलास रूईखेडमधील काही लोकांनी मारहाण केली. या घटनेत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रूईखेडमधील २१ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितावर अँट्रॉसिटी अँक्टखाली ३ जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. बुलडाणा तालुक्यातील रूईखेड मायंबा या गावातील फिर्यादी राधाबाई गुलाबराव उंबरकर (वय ५0) या महिलेने धाड पोलिसात तक्रार दिली, की २ जून रोजी रात्री ८.३0 च्या सुमारास रूईखेड गावाकडे घरी जाताना वाटेत, आरोपी सुखराम रामराव उगले, विजय तेजराव उगले व इतर १९ जणांनी मला व पतीस आणि मुलास बैलजोडी चोरण्याच्या आरो पावरून लाठय़ाकाठय़ांनी मारहाण करत विनयभंग केला. सोबत मारहाण करून जातीवाचक शिव्या देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर कलम १४३, ३५४, ३५४ (ख), ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, २९४, ५0६ तसेच २, ३, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार १९८९ नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेतील २१ आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. मारहाणीत जखमी राधाबाई उंबरकर व रवींद्र उंबरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुखराम उगले यांनी धाड पोलिसात तक्रार दिली, की आरोपी रवींद्र गुलाबराव उंबरकर, राधाबाई उंबरकर आणि गुलाबराव उंबरकर यांनी माझ्या शेतातील गोठय़ातून बैलजोडी चोरण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना प्रत्यक्ष पकडले, विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपींवर कलम ३८0, ४५७, ५११ भादंवि नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी एसडीपीओ बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. तपास बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील, एएसआय गजानन मुंढे, ना.पो.कॉ. प्रकाश दराडे, माधव कुटे, विजय मेहेत्रे, गजानन मोरे, दशरथ शितोळे, बळीराम खंडागळे हे करत आहे.
बैलजोडी चोरीच्या आरोपावरून दाम्पत्यासह मुलास मारहाण
By admin | Published: June 05, 2017 2:26 AM