बुलडाणा : जिल्ह्यासाठी भूषण ठरणारे, लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बुलडाणा येथील नियोजित बालभवनाचे काम त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने आ पण प्रयत्न करू, असे आश्वासन बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाण्यातील बच्चेकंपनीला दिली. बाल दिनाच्या निमित्ताने आज १४ नोव्हेंबरला आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या वतीने सकाळी बालकवींची काव्यमैफल आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा मुलांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या काव्यमैफलीमध्ये बालकांनी आपआपल्या स्वरचित कविता सादर केल्या.अनोख्या कविसंमेलनाच्या सुरुवातीला आमदार सपकाळ, लेफ्टनंट कमांडर महेंद्रकुमार, सुजाता कुल्ली, सुभाष किन्होळकर आणि काही बालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. निरपेक्ष मनाने बालकांनी केलेला हा सत्कार आयुष्यात पुढील अनेक वर्षे लक्षात राहील, अशी भावना आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सत्कारप्रसंगी व्यक्त केली. बाल कविसंमेलनामागील भूमिका नरेंद्र लांजेवार यांनी व्यक्त केल्यावर बालकवी सुभाष किन्होळकर यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कविसंमेलनाची रंगत वाढत गेली. कार्यक्रमाचे संचलन श्रावणी शिंदे हिने केले. उपस्थितांचे आभार पुस् तकमैत्रीच्या वतीने रविकिरण टाकळकर यांनी केले.
बाल दिनी रंगली बालकवींची मैफल
By admin | Published: November 14, 2014 10:43 PM