बुलडाणा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचया वतीने अपंग व मूकबधीर विद्यालयात दिव्यांगाना अन्नदान करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारणाचा विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी शिकवला असून याच मार्गावर काम करत राहणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत म्हणाले. सुरुवातीला बाळासाहेबांच्या प्रतिमेला हारर्पण करत अभिवादन करुन स्रेहभोजन तसेच खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक संजय गायकवाड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.सिंधूताई खेडेकर, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, न.पा.सभापती दिपक सोनुने, उमेश कापुरे, किसानसेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, बाळासाहेब बारोटे, राजु मुळे, राहुल सोळंके, श्रीकृष्ण शिंदे,मोहन पºहाड, अविनाश वाघ, जीवन उबरहंडे, समाधान मोरे, नंदु जाधव, सचिन परांडे, संजय तोटे, राहुल जाधव, जितेंद्र भाकरे, लहु राठोड, वैभव देशमुख तसेच शाहीनाताई पठाण, पवार सर, देशपांडे सर, आडवे सर यांच्यासह मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक वृध्द व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बुलडाण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगाना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:58 PM
बुलडाणा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचया वतीने अपंग व मूकबधीर विद्यालयात दिव्यांगाना अन्नदान करण्यात आले.
ठळक मुद्देशिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला