स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात भारतीय जीवन विमा निगम शाखा बुलडाणाचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अभय कुलकर्णी, सहा. व्यवस्थापक सखाराम करवते, विकास अधिकारी राजेश गावली यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश सरपंच विश्वनाथ हिवराळे, उपसरपंच गणेश पाखरे, ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे यांना सोपविला. विमा प्रतिनिधी आसिफ मिर्झा यांनी विमा उद्दिष्ट पूर्ण केल्याने हे बक्षीस मिळाले आहे.
याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य राहुल पाखरे, सतीश नाके, गजानन कृपाळ, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा हावरे, संतोष तोंडे, दीपक बाभुळकर, रामेश्वर मुरडकर, हिम्मतराव आवले, हनिफ शाह,सांबा मिटकरी, भानुदास सराफ, राजेश तिरके, रामशेळके, गजानन दुतोंडे, विजय केदारे, सचिन वाळके,राजू खंडागळे, गजानन उंबरकर, राजू केदारे, आर.के.नकवाल, शे. अजिस, गणेश गायकवाड, श्रीराम इंगळे, गजानन दांडगे, रवि मोरे, छगन मोरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बक्षिसाच्या रकमेतून आपण प्रवाशांच्या सोयीसाठी बसथांब्यावर प्रसाधनगृह बांधणार असल्याचे सरपंच विश्वनाथ हिवराळे यांनी सांगितले. यावेळी विमा अधिकाऱ्यांच्या हस्ते या प्रसाधनगृहाच्या कामास कुदळ मारून सुरुवात करण्यात आली.