शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

बनावट सोने तारण ठेवून बँकेची २७ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 3:19 PM

बँकेचे मुल्यांकन अधिकारी दीपक वर्मा व अन्य ११ जणांनी बँकेत बनावट सोने तारण ठेवून २७ लाखांनी बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बँकेतील मुल्यांकन अधिकाऱ्याने जवळपास ११ जणांशी संगणमत करून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून स्थानिक जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेची २७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना १५ डिसेंबर रोजी सायंकाळी बुलडाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.तारण ठेवलेले सोने प्रत्यक्ष सोनाराकडे तपासणी करण्यात आली असता हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे या साने तारण प्रकरणात अन्य धातूच्या दागिन्यांना सोन्याची पॉलीश करण्यात आली होती, असे पोलिस तपासात समोर येत आहे. जवळपास सहा महिन्यापासून हे प्रकरण सुरू होते. त्यात अखेर १५ डिसेंबर रोजी जिजामाता नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक दीपक अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली.त्यामध्ये जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेचे मुल्यांकन अधिकारी दीपक वर्मा व अन्य ११ जणांनी बँकेत बनावट सोने तारण ठेवून २७ लाखांनी बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून १५ डिसेंबर रोजी यातील दीपक वर्मासह संजय शंकर पठारकर, मोहन खरात, मनोहर श्रीराम सावळे, कन्हैयालाल बद्रीनारायण वर्मा आणि प्रविण रमाकांत वाडेकर या सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुलडाणा न्यायालयाने सहा ही आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण १२ आरोपी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते आणि ठाणेदार शिवाजी कांबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे मात्र बुलडाणा शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, या प्रकरणा आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत असून या प्रकरणाची व्याप्तीही मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाfraudधोकेबाजीbankबँक