बुलडाणा: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आला आहे. परंतू बँकामधील सरसकारी व्यवहारांसाठी येत्या रविवारी बँका चालू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू राहणार आहेत. मार्च एंन्डीगमुळे गेल्या महिनाभरापासून बँकामध्ये कामांची धूम सुरू आहे. सरकारी बँकाबरोबच पतसंस्थांमध्येही कर्मचारी कामात व्यस्त दिसून येत आहेत. दरम्यान, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च, रविवारी असल्याने बँकेतील सरकारी कामकाजासाठी सर्व बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने तसे परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना दिले आहे. या बँकाच्या शाखांमधील देवाण-घेवाणीचे व्यवहार ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणीची वेळही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढविण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सरकारी बँक रविवारी पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्य कर भरणे, सरकारी अर्थिक व्यवहार पूर्ण करणे यासारखे कामे केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
इंटरनेटच्या अडचणी कायमआर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस जस-जसा जवळ येत आहे, तशी बँकामधील कामेही वाढत आहेत. वर्षभरातील आर्थिक व्यवहार जुळवणे, कर भरणे, कर्ज प्रकरणे निल करणे यासाखी कामे सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही आहेत. ही सर्व कामे वाढलेली असताना बँकेमधील इंटरनेट सेवा वारंवार विस्किळीत होत आहे. मार्च महिन्यातही इंटरनेटच्या अडचणी येत असल्याने तासन् तास बँकेतील कामकाज थांबत आहे. त्यामुळे बँक कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
येत्या रविवारी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी बँका सुरू राहणार आहेत. त्यामध्ये कर भरणे व सरकारी व्यवहार केले जाणार आहेत. - उत्तम मनवर, व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया (अग्रणी बँक) बुलडाणा.