शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ देण्यासाठी अडवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:34 IST

Demand Money to give Newborn baby केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक करण्याची घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली.

ठळक मुद्देचिखली ग्रामीण रूग्णालयातील संतापजनक प्रकार.महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी १२०० रूपयांची मागणी केली. पार्वतीबाईकडे त्यावेळी दीड हजार रुपयेच होते.

चिखली : सरकारी रूग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रूग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. येथील ग्रामीण रूग्णालयातही असेच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडले आहेत. कामचुकारपणाचा कळस व पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक करण्याची घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली. तर २१ डिसेंबरच्या रात्री प्रसव वेदनेने विव्हळणाº महिलेकडे साफ दूर्लक्ष केल्या गेले. नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईला करावी लागली. या स्थितीतही सुमारे हजार रूपये उकळण्यात आले.

पार्वती सुरडकर यांनी आपल्या गरोदर मुलीला १९ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्याने रूग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी १२०० रूपयांची मागणी केली. मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीपश्चात त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी करण्यात आली. मोलमजुरीने उदरनिर्वाह करणाऱ्या पार्वतीबाईकडे त्यावेळी दीड हजार रुपयेच होते. त्यात रात्रीची वेळ पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्या महिलेला पडला होता. मात्र, लालसेची परिसीमा गाठलेल्या संबंधीत महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित पाचशे रूपये द्या तेव्हांच बाळ देईल, अशी अडवणूक केली आहे. याबाबत पार्वतीबाईंनी लेखी तक्रार देखील केली आहे.दुसऱ्या प्रकरणात सवणा येथील शे. समीर शे. सत्तार यांनी २१ डिसेंबरच्या रात्री आपल्या बहिणीला प्रसुतीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. या महिलेला १० वाजेच्या सुमारास प्रसुतीवेदना सुरू झाल्याने महिलेच्या कुटूंबियांनी रूग्णालयात कार्यरत परिचारकांना याबाबत माहिती देवून पेन्शटला पाहण्याची विनंती केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णास पाहण्याचे सोडून सकाळी प्रसुती होईल असे सांगून रुग्णाकडे पाहण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान गरोदर महिलेला त्रास वाढल्यानंतर पुन्हा माहिती दिली असता बुलडाणा येथे पाठविण्याची धमकी दिली. तिसऱ्यांदा विनंती केली असता महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णाकडे पाहण्याचे टाळले. नाईलाजाने महिलेच्या तीव्र प्रसुती वेदना पाहता तिच्या आईनेच स्वत: तिची प्रसुती सुकर केली. रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष तर केलेच शिवाय कुटुंबियाकडून ५०० रुपयेही घेतले. याखेरीज साफसफाई करणाऱ्या महिलेने २०० तर रक्त-लघवी तपासणीसाठी वेगले ३०० रुपे घेण्यात आल्याचा आरोप शेख समीर यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे.

पार्वतीबाईंचा व्हिडीओ व्हायरल !

केवळ पाचशे रूपयांसाठी बाळ देण्यास टाळल्याची तक्रार करणाऱ्या पार्वतीबाई सुरडकर यांच्या तक्रारीचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत करण्यात आला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यातून रूग्णालयात चाललेल्या अनागोंदीची पोलखोल झाली आहे.

चौकशी समिती स्थपान करून अहवाल पाठवणारया प्रकरणात चौकशी समिती स्थापन करून दोन्ही परिचारिका दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक डॉ. फारूखी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आयशा तबस्सुम खान यांनी सांगितले.

टॅग्स :Chikhliचिखलीbuldhanaबुलडाणा