धम्मप्रसेन भीमराव जाधव (२४, रा. मंगरूळ नवघरे, ता. चिखली) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरीपुत्राचे नाव आहे. धम्मप्रसेन हा वडिलांसोबत शेतातून घराकडे परत येत होता. तेव्हाच शेतातील तूर वाढल्याने त्यांना अस्वले दिसली नाहीत. एकाएकी अस्वलांनी धम्मप्रसेनवर हल्ला चढविला. त्यावेळी सोबत असलेल्या वडिलांनी आरडाओरड करत हातातील काठीने अस्वलांना हाकलण्याचा प्रयत्न केला; पण अस्वले तेथून काही जात नव्हती. त्यांच्या हल्ल्यात धम्मप्रसेन हा गंभीर जखमी झाला.
फटाके फोडून पळविले अस्वलांना
अस्वलांच्या तावडीत सापडलेल्या मुलाला पाहून शेतकरी भीमराव जाधव यांनी रोही व हरणांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी सोबत आणलेले फटाके समयसूचकता दाखवत फोडले. या फटाक्यांच्या आवाजामुळे अस्वले पळून गेली. गंभीर जखमी झालेल्या धम्मप्रसेन यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वलांच्या मुक्त संचारामुळे मंगरूळ-नवघरे, अमडापूर शिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वीही अमडापूर परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले होते.