बीबी : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर रंगलेल्या पार्टीत वाद हाेऊन पिंप्री खंदारे येथील एका हाॅटेलची बीबी पाेलीस स्टेशनचे बीट जमादार शेख आसीफ व इतरांनी ताेडफाेड केली हाेती. याप्रकरणी पाेलीस अधीक्षकांनी शेख आसीफ यांना निलंबित केले आहे.
१५ जानेवारी रोजी पिंपरी खंदारे ता. लोणार येथील ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. त्यानंतर तंटामुक्त समिती अध्यक्ष व बीट जमादार शेख असिफ यांच्यासह सात जणांनी पिंपरी शिवारात हायवेला लागून असलेल्या धाब्यावर पार्टी केली. त्यावेळेस हॉटेलमध्ये मद्य प्राशन करण्यास लक्ष्मीबाई वायाळ व इतरांनी मनाई केली असता महिलेला अश्लील शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हॉटेलमधील फायबर खुर्च्यांची व टेबलची तोडफोड करून १४ हजार रुपयाचे नुकसान केले. याप्रकरणी बीबी ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टवरून बीबी पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी तपासात बीट जमादार दोषी आढळून आल्याने पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी शेख असिफ यांना निलंबित केले आहे.