बुलडाणा: वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथालय किंवा ग्रंथोत्सवाचा मूळ घटक वाचक असतो. त्यामुळे वाचक दूर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ते २८ डिसेंबर रोजी स्थानिक गर्दे वाचलनालयाच्या सभागृहात बुलडाणा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबुराव पाटील हे होते. तर उद्घाटक म्हणून आ. हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती. सकाळी ९ वाजता ताराबाई शिंदे यांचा वाड्यापासून गं्रथपूजन व ग्रंथदिंडी काढून ग्रंथोत्सवाला सुरूवात करण्यात आली. पुढे बोलताना आ. सपकाळ यांनी वाचन संस्कृतीवर प्रकाश टाकत पूर्वीचे वाचक व आताची परिस्थिती विषद केली. वाचन संस्कृतीसाठी एक संस्थापीक काम करायचे असून वाचक वर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. वाचन आजही केले जाते, मात्र काय वाचावे, कुठे वाचावे, कसं वाचावे हे समजायला हवे. आज डिजीटलच्या युगात पुस्तक वाचण्यापेक्षा प्रत्येक जण दृक-श्राव्य माध्यमाकडे वळले आहेत. वाचनाऐवजी आॅनलाइन व्हिडीओ बघण्यात वेळ घालवला जातो. परंतू असत्य पसरविणारे आॅनलाइन व्हिडीओंचे प्रमाणही वाढले आहे. अशा व्हायरल होणाºया व्हिडीओचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे काय वाचले पाहिजे, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे आवाहन आ. सपकाळ यांनी यावेळी केले. माजी आ. बाबुराव पाटील यांनी जीवनात वाचनाचे महत्व विषद केले. वाचन केल्याशिवाय आपण जीवंत राहणार नाही. मानव भाकरीमुळे जीवंत राहिल, पण ग्रंथामुळे जीवन कसे जगायचे हे समजेल. त्यामुळे वाचन ही सुद्धा एक भूक आहे. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण तंतोतंत खरी आहे. परंतू ही म्हण केवळ म्हणी पुरती न राहता ती मनावर घेतली पाहिजे. वाचन हे डोक्यात घेतले पाहिजे, असे माज आ. बाबुराव पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा गं्रथपाल सतिष जाधव यांनी केले. तर संचालन निशिकांत ढवळे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालयांचे ग्रंथपाल व वाचक उपस्थित होते.
बुलडाणा जिल्हा ग्रंथोत्सवाला सुरूवात: ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 4:27 PM