जैवविविधता धोक्यात
बीबी : वाढत्या प्रदुषणामुळे जैवविविधता धोक्यात सापडली आहे. रेती वाहतूकीची वाहने जंगल परिसरातून जातात.
धरणात टाकले कमळाचे सीडबाॅल
बुलडाणा : येथील वन्यजीव सोयरेच्यावतीने बोथा धरणात कमळाचे सीडबाॅल बुधवारी टाकण्यात आले आहेत. सीडबाॅल टाकून वन्यजीव सोयरेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
नोकरीचा उपयोग कुटूंबासाठी करा: शिंगणे
बुलडाणा : अनुकंपा तत्वावर मिळालेली नोकरी ही आपल्या कुटूंबाच्या चरितार्थासाठी असते. त्याचा उपयोग परिवारासाठी करा, असे आवाहन पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. ते शहरातील एका कार्यक्रमात बोलत होते.
पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी
बुलडाणा : पावसामुळे येथील संगम चाैकातील रस्त्यावरच पाणी साचले आहे. गुरूवारी सकाळी झालेल्या झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. संगम चाैकातही परिसरातून वाहून येणारे पाणी दुकानांसमोर साचल होते.
संत सेवालाल महाराज जयंती साजरी
अमडापूर : हरणी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती होती.
वैद्यकीय देयके मिळण्यास दिरंगाई
धामणगाव बढे : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारानंतर देयक मिळण्यास प्रचंड विलंब होतो. देयक सादर केल्यानंतर एका महिन्याच्या आत हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
पावसामुळे बटाटा पिकाचे नुकसान
देऊळगाव राजा : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बटाट्याची शेती केली आहे. २० एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर बटाट्याची लागवड करण्यात आली आहे. पीक चांगल्या स्थितीत असताना गुरूवारी अचानक पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले.
फेरीवाल्यांना मदतीची प्रतीक्षा
लोणार : केंद्र शासनाच्या वतीने फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर भारत याेजनेंतर्गत १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. परिसरातील अनेक फेरीवाल्यांना अजुनही या याेजनेचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
चित्रकला सवलतीच्या गुणांसाठी मुदतवाढ
जानेफळ : माध्यमिक शालांत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला या विषयाच्या सवलतीचे अतिरिक्त गूण देण्याचे प्रस्ताव पाठविण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यामध्ये निरुत्साह
हिवरा आश्रम : इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत असलेल्या सर्व शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निरूत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
चित्रकला सवलतीच्या गुणांसाठी मुदतवाढ
जानेफळ : माध्यमिक शालांत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला या विषयाच्या सवलतीचे अतिरिक्त गूण देण्याचे प्रस्ताव पाठविण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बुलडाणा शहरात ३० कोरोना पाॅझिटीव्ह
बुलडाणा : शहरात काेराेनाचा कहर सुरूच असून गुरूवारी ३० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. काेराेना रुग्ण वाढत असताना ग्रामस्थांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत.
पर्यावरण संरक्षणाची शपथ
बुलडाणा: माझी वसुंधरा अभियानांतर्गत बुलडाणा नगरपालिकेमध्ये पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. पालिकेमध्ये आयोजित या कार्यक्रमात नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.