लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तिसऱ्या लाटेची प्राथमिक जागतिक स्तरावर सुरू झाली असून १११ देशात डेल्टा विषाणू सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयस्तरावर प्रसंगी गंभीर रुग्ण आल्यास त्याच्यावर कसे उपचार करावेत तथा यासंदर्भातील अडचणीवर मात करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कोवीड समर्पीत रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहेत. त्यातच दुसऱ्या लाटेदरम्यान बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील कोवीड समर्पीत रुग्णालयांवर मोठा ताण आला होता. तो तिसऱ्या लाटेदरम्यान कमी करण्याच्या दृष्टीने यंत्रणेने नियोजन केले असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये किमान ३० बेडवर ऑक्सिनज सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. दुसऱ्या लाटेत ४९ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील होते. त्यामुळे रुग्णालयांची सुसज्जता वाढविण्यावर भर दिला जात आहे.
५२२५ बेड्सची सज्जताजिल्ह्यातील कोवीड समर्पीत रुग्णालय, कोवीड हॉस्पीटल, कोवीड केअर सेंटर मिळून ५२५ बेड्सची सज्जता करण्यात आली आहे. यात ४९४ आसीयू अेाटू बेड, १३४५ अेाटू सपोर्टेड बेड, ११४ आसीयू व्हेंटिलेटर बेड आणि अेाटू व्यतिरिक्त ३,२६५ बेडची उपलब्धता करण्याची क्षमता आरोग्य विभागाने निर्माण केली आहे.लहान मुलांसाठी केअर सेंटरलहान मुलांसाठी खामगाव, बुलडाणा आणि शेगाव येथे प्रत्येकी ५० बेडच्या क्षमतेचे केअर सेंटर उपलब्ध करण्यात येत आहे. हे सर्व बेड ऑक्सिजन युक्त राहणार आहे. यासोबतच ग्रामीण रुग्णालयामध्येही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येत आहे.
१६ ऑक्सिनज प्लांट तयार प्रसंगी ऑक्सिजनची मागणी २५ मेट्रीक टनापर्यंत गेल्यास १,८५२ जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यासाठी एक बॅकअप प्लान ही आरोग्य विभागाकडे तयार आहे. खामगाव व बुलडाणा येथे सिलींडर रिफिलींग करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आलेले आहे. खासगी व शासकीय मिळून एकूण १६ पीएसए प्लांट जिल्ह्यात सध्या उभारण्यात आले आहेत.
संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्जता ठेवली आहे. ऑक्सिजनसाठीही आणखी ६ केएल व दहा केएलचा लिक्वीड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रामध्येही ऑक्सिजन उपलब्धतेसाठी ऑक्सिनज पाईपलाईनही टाकण्यात येत आहे.-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्क, बुलडाणा