बुलडाणा: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांकरीता केंद्रवर्ती अर्थसंकल्पामध्ये न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना जमिन प्राप्त झालेली आहे. सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषारसंच पुरवठा करण्यात येणार असून, या योजनेसाठी २९ जून पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे अर्ज सादर करावे लागणार आहेत.८५ टक्के अनुदानावर तुषारसंचचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जमातीचा असावा, लाभार्थीकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असावे, अपंग, विधवा, परित्यक्तया लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्याकडे दारीद्र्य रेषेचे कार्ड किंवा राशन कार्ड असावे, लाभार्थीने रहिवाशी दाखला सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ डिबीटी द्वारे देण्यात येत असल्याने बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे जमिन धारणेचा सात/बारा दाखला व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ जिल्हा कृषी अधिक्षक, कृषी विभागाकडून न मिळाल्याबाबचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. पाण्याचे स्त्रोत विहीर, नाला, नदी असणे आवश्यक आहे. पाणी उपसाचे साधन तेलपंप, विजपंप असणे आवश्यक आहे. कुटूंबातील कोणत्याही एका व्यक्तीस योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या सात/बारा उताºयावर नोंद घेण्यात येणार असून, यापुर्वी लाभ घेतलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.अशी माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी दिली आहे.
वऱ्हाडातील आदिवासी शेतकऱ्यांना तुषार संचचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 2:36 PM