शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

‘सिम व्हेरिफिकेशन पेेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:24 AM

बुलडाणा : तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी तुमचा फोन काहीवेळ बंद ...

बुलडाणा : तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी तुमचा फोन काहीवेळ बंद ठेवा, असे सांगणारा कॉल जर तुमच्या मोबाइलवर आला, तर सावधान! ही तुमची फसवणूक असू शकते. इतकेच नव्हे तर सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी कॉल असल्याचे सांगूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

गतवर्षी ऑनलाइन फसवणुकीच्या ३९, तर २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत तब्बल ९ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. सायबर भामटे विविध शक्कल लढवून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. ओएलएक्सद्वारे वाहन विक्री, रिफंड तसेच लॉटरी लागल्याचे सांगून फसवणूक करीत आहेत. इतकेच नव्हे तर बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिनकोड क्रमांक विचारून नागरिकांची फसगतही केली जात आहे. आजपर्यंत तुमच्या ई-मेलवर अनेकवेळा तुम्हाला लाखो रुपयांचे बक्षीस लागले आहे, आम्हाला खासगी माहिती मेल करा, अशाप्रकारे मेल येत हाेते, मात्र आता या मेल्सबाबत अनेक जण जागरूक झाले आहेत. त्यामुळेच आता आर्थिक फसवणूक करण्यासाठी मोबाइलचा इंटरनेट डेटा अपडेट करायचाय, असं सांगत तुमची फसवणूक करण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फेक कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान

काेराेनामुळे जिल्हाभरात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व जण घरीच आहेत. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी विविध ॲप्स डाऊनलोड करताना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही ॲपवर आपली खासगी माहिती विचारल्यास ती देऊ नये, चाैकशी करूनच ॲप डाऊनलोड करावे.

असा कॉल वा मेसेज आल्यास दक्षता पाळणे गरजेचे

सायबर भामटे फसव्या लिंक अथवा मेसेज पाठवून फसवणूक करीत असल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय एटीएम, केवायसी किंवा डेबिट, क्रेडिट कार्ड अपडेट तसेच सिम कार्ड व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून बँक खाते क्रमांक व त्यांच्या मोबाइलवर असलेला ओटीपी मिळवून कॅशबॅक देण्याचे आमिष दाखवून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते, तसेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्याचे प्रकार वाढत आहे.

अशी घ्यावी काळजी

अनाेळखी फाेन आल्यास प्रतिसाद देऊ नये. एटीएमचा पासवर्ड कुणालाही सांगू नये. बँकेतून फोन आल्याचे सांगितल्यास ताे कट करावा. एटीएम बंद असल्याचे सांगितल्यास बँकेत जाऊन चाैकशी करावी. विमा काढायचा सल्ला दिल्यास थेट नकार द्यावा. लाखांची लॉटरी लागल्याचा फोन आल्यास विश्‍वास ठेवू नवे. मोबाइलवर येणारे फेक मेसेस, लिंक ओपन करू नका आदी काळजी घेतल्यास फसवणूक होण्यापासून तुम्ही दूर राहाल.

काेट

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना गत काही दिवसांपासून वाढल्या आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनाेळखी फाेन काॅल, मेसेज आल्यास प्रतिसाद देऊ नये. प्रलाेभणे दाखवल्यास त्याला बळी पडू नये. फाेनवरून किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार करावी.

प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक,सायबर सेल