लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील ७0 वर्षीय ह्यसुपर आजीह्ण चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आतापर्यंंंत या सुपर आजीने माहूरगड, वैष्णवदेवीपर्यंंंंतचा तब्बल ४,000 किलोमीटरचा प्रवास मागील दोन वर्षात पूर्ण केला असून, यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे. रेखा जोगळेकर असे या सुपर आजीचे नाव असून, त्यांनी एम.ए.बी.एड. पर्यंंंतच शिक्षण घेतले आहे. अगोदरपासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदेत तब्बल ३0 वर्ष केंद्रप्रमुख म्हणून कामसुद्धा या सुपर आजीने केले आहे. सेवानवृत्तीनंतर काहीतरी अनोखे करण्याची जिद्द घेऊन या सुपर आजीने गेल्या तीन वर्षांंंंपासून भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे. या वयात काहीतरी हटके करून दाखविण्याची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली असल्याचे त्या सांगतात. अगदी ७0 व्या वर्षी ठणठणीत दिसणार्या सुपर आजीचा आदर्श प्रत्येक नवयुवतींनी घ्यावा, असे त्यांना वाटते. आजच्या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत, हाच संदेश घेऊन त्यांनी हा भारत भ्रमंतीला निर्धार केला आहे. नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत. ते सध्या यवतमाळ येथे एमएसईबीमध्ये ठेकेदारी करतात. रेखा जोगळेकर २१ जून रोजी निघाल्या आणि साधारण २२ जुलैला पोहचणार आहेत. अगदी पावसाळ्याचा सुरुवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरू होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात व रात्री विश्रांती घेते. प्रत्येक गावात या सुपर आजीचे स्वागत केल्या जाते. ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते. त्यामुळे तब्बल २,000 किलोमीटरचा हा सायकल प्रवास आजीबाईला आनंददायी असाच वाटतो. प्रवासाला निघत असताना आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ही सुपर आजी कपडे आणि काही ऊन-पावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन भारत भ्रमंतीला निघाली आहे.
‘सुपर आजी’ ची सायकलने भारत भ्रमंती
By admin | Published: June 24, 2017 5:34 AM