Bharat Jodo Yatra: ...मी वारकरी आगळा!

By अनिल गवई | Published: November 19, 2022 06:02 AM2022-11-19T06:02:00+5:302022-11-19T06:02:43+5:30

Rahul Gandhi:  ‘पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’, या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भाची पंढरी शेगाव येथे वारकऱ्यांच्या रिंगणात हजेरी लावली.

Bharat Jodo Yatra: ...me warkari agla! | Bharat Jodo Yatra: ...मी वारकरी आगळा!

Bharat Jodo Yatra: ...मी वारकरी आगळा!

Next

- अनिल गवई
खामगाव (जि. बुलढाणा) :  ‘पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’, या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भाची पंढरी शेगाव येथे वारकऱ्यांच्या रिंगणात हजेरी लावली. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ- मृदंगाच्या 
गजरात त्यांनी  ‘विठूनामा’चा जप केला. ‘गण गण गणात बोते’चा 
जयघोष होताच अवघी शेगावनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.  
पदयात्रेचे बाळापूरमार्गे  शेगावात आगमन झाले. शेगाव- बाळापूर रोडवरील वरखेड फाट्यावर उभारण्यात आलेल्या २१ फुटी परमात्मा पांडुरंग भगवान (श्री विठ्ठल)  मूर्तीभोवती एक हजार वारकऱ्यांच्या सहभागात त्यांनी रिंगणाचे मनोभावे निरीक्षण केले.
‘विठ्ठल माझा... माझा आणि मी विठ्ठलाचा’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांच्या ओळी कानावर 
पडताच अवघी विदर्भ पंढरी 
भक्तिमय वातावरणात तल्लीन झाली होती. 
राहुल गांधी भक्तीत तल्लीन झाल्याचा प्रसंग पाहताच वारकरी आणि उपस्थितांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू तरळले.

Web Title: Bharat Jodo Yatra: ...me warkari agla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.