शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

सलाईबन येथे रंगली भीमराव पांचाळे यांची, "प्राणात चंद्र ठेवू "मैफील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 8:10 PM

Bhimrao Panchale's concert : ही मैफील सलाईबनच्या घनदाट जंगलात असूनही जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी यासाठी हजेरी लावली होती.

जळगाव जामोद  : दत्तजयंतीच्या शुभ पर्वावर सातपुडा पर्वतामधील सलाईबन येथे तरुणाई फाउंडेशन व सलाईबन मित्र मंडळ यांच्या वतीने "प्राणात चंद्र ठेवू" या गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.ही मैफील सलाईबनच्या घनदाट जंगलात असूनही जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी यासाठी हजेरी लावली होती.        एक एक कडी चढवत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी मैफीलीत नेहमीप्रमाणे रंगत आणली "जो नको तो प्रकार मी केला,या जगाचा विचार मी केला....जीवनाशी आता पटे माझे,सोसन्याचा करार मी केला"या गजल मधून जीवनाचे चढ-उतार सुख दुःख मांडत त्यांनी आपल्या गझल मैफिलीला सुरुवात केली.प्रचंड थंडी असूनही गर्मी आणली ती गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलने.असे म्हणतात की गझल ही शब्द सुरांची पालखी आहे. ह्या मैफिलीचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.कडक थंडी असूनही मैफिली रंगत गेली आणि मैफिलीचा शेवट माझी "जगण्याची न्यारी रीत आहे...पोटात भूक माझ्या, ओठात गीत आहे" या भरजरी गझलने झाली.        "येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे.... गंध दे फुलांचा मजला हसणे निर्व्याज दे...या गझलने तर उपस्थित प्रौढांनाही तारूण्यात आल्यासारखे वाटले.सळसळत्या तारुण्याचा आस्वाद काय असतो याची जाणीव करून दिली. टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी भरभरून साथ दिली."केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी,काटे कुठेच नव्हते दिला दगा फुलांनी...गाफील राहीली मी त्या नेमक्या क्षणाला,मागून वार केले माझ्याच माणसांनी..." या गजल मधून भीमराव पांचाळे यांनी सध्याच्या सामाजिक व्यवस्थेचे चित्रण सादर केले. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना जीवनात गाफील राहू नका असा संदेशही या गझलमधून त्यांनी दिला.एकावर एक गझलची कडी चढत असताना चंद्र माथ्यावर आला होता.घड्याळाचे काटे सरकत होते.थंडी आवरत नव्हती पण तरीही पुढच्या एका गझलने सर्वांना जागेवर स्थितप्रज्ञ केले.

"गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अन काळी काय...महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय....रक्त लालच आहे सर्वांचे कशास मगही भेद भावना,सगळ्यांना मातीत जाणे कुणबी काय माळी काय..." या लोकप्रिय गझलने वातावरण गहिवरून गेले होते."क्या शहर हय तुम्हारा बहुरूपीयोकी नगरी मिलते है.. लोग अक्सर चेहरे बदलते बदलते..."या गझलने दर्दी उपस्थितांमध्ये रंगत आणली.आजच्या सामाजिक व्यवस्थेचे चित्रण यामधून करण्यात आले.  कोणतेही मानधन न घेता सलाईबन येथे पर्यावरण पूरक चळवळीला मदत करण्यासाठी गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी ही गझल मैफिल सादर केली आणि स्वतः एक लाखाचा निधी या चळवळीला प्रदान केला.यावेळी आमदार डॉ.संजय कुटे यांनी सलाईबनच्या विकासासाठी दहा लाखाचा आमदार निधी देण्याचे मान्य केले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भीमराव पांचाळे यांचा सत्कार केला.

या मैफिलीला काँग्रेस पक्षनेत्या डॉ.स्वातीताई वाकेकर,गझलकार डॉ. गणेश उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, यवतमाळचे निवासी जिल्हाधिकारी डॉ.वराडे, नगराध्यक्ष सीमा डोबे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या गझल मैफलीचे संचालन प्रसिद्ध कवी किशोर बळी व अरविंद शिंगाडे यांनी केले.या गझल मैफिलीला महिलांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदmusicसंगीत