बुलडाणा : महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्याचे जयस्तंभ चौक येथे १४ एप्रिल रोजी पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच धम्मवंदना भन्ते स्वरानंदजी यांनी घेऊन भूमिपूजन करण्यात आले. स्वागत समितीचे प्रा. दादाराव गायकवाड , दिलीप दौलतराव जाधव, सिध्दार्थ आराख , समितीचे अध्यक्ष ॲड़ सुमित सरदार, पी.एस. मेढे , अनिल आराख यांनी मान्यवरांचे स्वागत केले़ प्रास्ताविक संचालन समितीचे सचिव अशोक इंगळे यांनी केले.
बुलडाणा शहरातील मध्यवर्ती जयस्तंभ चौक येथे गेल्या ३० वर्षापूर्वी बसविण्यात आलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे पुणे येथील कला संचालयाच्या नियमात नसल्याने त्यांच्या मध्यस्थीने हटविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या माध्यमातून या मध्यवर्ती जागेवर पुतळे उभारण्याचा संघर्ष गाजला.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. सुमित सरदार, कार्याध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष दादाराव गायकवाड, सचिव अशोक इंगळे, दिलीप दौलत जाधव यांच्या पुढाकाराने समितीचे गठन करण्यात आले. परंतु पुतळा होऊ नये म्हणून काही विघ्नसंतोषींनी केवळ स्वार्थासाठी जागेचा वाद निर्माण करून उपोषण करुन पुतळा उभारणीच्या कामात शेवटपर्यंत विरोध केला. पंरतु शासन दरबारी पुतळा उभारणीच्या सर्व कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता करून आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने, २६ नगर सेवकांच्या सहकार्याने व स्मारक समितीच्या पाठपुराव्या अंती १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कुठल्याही विरोधाला न जुमानता भूमिपूजन करण्यात आले़
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. सुमित सरदार कार्याध्यक्ष दिलीप माधवराव जाधव, उपाध्यक्ष दादाराव गायकवाड, दिलीप दौलतराव जाधव , अनिल आराख, ॲड . गणेश इंगळे, राहूल सुरडकर ,सिध्दार्थ आराख, प्रा. एस.पी हिवाळे, सतीश पवार , सुमित गायकवाड, डी. आर. इंगळे, सावजी जाधव, पी.एस. मेढे, लक्ष्मण साळवे, हिंमत पव्हरे , दिपक मनवर , संजय जाधव ॲड . अशोक गवई, देवानंद मोरे प्रसिध्दी प्रमुख पत्रकार संजय जाधव, नितिन सिरसाट आदी उपस्थित होते.