शहरातील गांधी भवन परिसरात भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी बुलडाण्यातील आदिवासी समाजाच्यावतीने करण्यात येत होती.आ. संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून जयस्तंभ परिसरात ही जागा निवडण्यात आली. साेमवारी जागतिक आदिवासी दिन व भगवान वीर एकलव्य यांची जयंती असल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी या ठिकाणी जमले होते. प्रारंभी संगम चौक परिसरातून आदिवासी समाजाच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती आशिष जाधव, युवासेनेचे श्रीकांत गायकवाड, समिती अध्यक्ष विजय माेरे, राजेश टारपे, नंदिनी टारपे, बाळासाहेब नारखेडे, बाळू जेऊउघाले, कैलास माळी, एकनाथ बर्डे, बाळू बर्डे, उमेश बर्डे, विनोद ठाकरे, विक्रम मोरे, सुनील बर्डे, बळीराम मोरे, अरुण बर्डे, दिलीप पवार, लखन ठाकरे, आमदार संजयग गायकवाड यांचे स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव व अन्य उपस्थित होते.
भगवान वीर एकलव्य पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:38 AM