राज्य मार्ग क्रमांक १६ च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार प्रतापराव जाधव व आमदार धर्मवीर संजय गायकवाड व जिल्हाप्रमुख जलिंधर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला़ हायब्रीड ॲन्यूटी अंतर्गत राज्य महामार्ग क्रमांक १६ मोताळा ते नांदुरा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले़ तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले़ या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करून त्याचा दर्जा राखावा असे आदेश खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी संबंधितांना दिला. यावेळी मोताळा तालुक्यातील शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचासुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना व युवासेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ (वा़ प्र.)
नांदुरा-मोताळा रस्त्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:40 AM