- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राज्यात २००० पासून विविध स्वच्छता अभियानाअंतर्गत वैयक्तीक शौचालयांची निर्मिती व त्याचा नियमित वापर होवून गावे असोत की शहरं; त्यांना लागलेला अस्वच्छतेचा कलंक पुसण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या योजनांचा निधी लाटण्यापलीकडे अद्यापही नागरिकांची मजल गेलेली नाही. गत दहा वर्षांत शौचालयांवर करोडा रूपयांचा खर्च होवूनही तालुक्यातील अनेक गावे चारही बाजुने घाणीने बरबटलेली दिसून येत आहेत.२०१९-२० केवळ या एका वर्षात शौचालयांवर ५ कोटी ३ लाख ७६ हजार रूपयांचा निधी खर्च झाला आहे. चिखली तालुक्यातील ९८ ग्रामपंचायती अंतर्गत सुमारे ५० हजार कुटूंब संख्या आहे. सुरूवातीला यापैकी ३२ हजारापेक्षा अधिक कुटूंबाकडे शौचालये नव्हती. विविध स्वच्छता अभियानांव्दारे या कुटूंबियांना शौचालयांचे अनुदान देवून शौचालयांचे बांधकाम गत दहा वर्षांपासून होत आले आहे. शासकीय आकडेवारीनुसार आजरोजी केवळ शौचालय नसलेले ग्रामीण भागातील नविन कुटूंबांची संख्या केवळ ९६० आहे. गावरस्ते, नदी, पूल, खुले मैदानांसह शाळा परिसर, जिथे बाजार भरतो ती जागा आणि कहर म्हणजे जिथे अत्यंविधी उरकला जातो त्या स्मशानभूमी परिसरात नाक दाबूनच जावे, अशी विदारक स्थिती आता पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे.
शौचालयांवर कोट्यावधीचा खर्च; तरीही गावात हगणदरी कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 4:41 PM