सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्थान साखरखेर्डा येथे दरवर्षी संस्थानच्या वतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. किनगाव जट्टू येथील गुरुभक्त टाळ, विना, पखवादाच्या निनादात पालखीसह पायी दिंडी सोहळा साखरखेर्डा येथे नेतात; परंतु यावर्षी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे साखरखेर्डा येथील सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे येथे स्थानिक उपासना मंडळाच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून श्रीराम मंदिराच्या सभागृहात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. जन्मोत्सवानिमित्त रंगनाथ बिनीवाले यांनी दासबोध ग्रंथाचे पारायण केले. शनिवारी राम रक्षा, उपासना, आरती आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी, अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय हा गजर करून महाराजांच्या प्रतिमेवर गुलाल व पुष्पवृष्टी करून जन्मोत्सव साजरा केला. कार्यक्रमाला भजनी मंडळ महिला व पुरुष गुरुभक्त उपस्थित होते. शेवटी प्रसाद वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बिनीवाले परिवाराने परिश्रम घेतले.
किनगाव जट्टू येथे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:30 AM