लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: शहरासह बोराखेडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा-सात जण जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. जखमींना उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बकर्यांनाही जखमी केल्याची माहिती माहिती आहे.मोताळा शहरासह बोराखेडी परिसरात रविवारी सायंकाळदरम्यान मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत लहान बालकांसह काही जणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात रेशमाबी इब्राहिम खा (१0, रा. बोराखेडी), शेरू शेख (३, रा. बोराखेडी), शिव गजानन कोल्हे (दीड वर्ष रा. मोताळा), सिंधूबाई वराडे (६0, रा. बोराखेडी), अहेमद रजा (४, रा. मोताळा) हे जखमी झाले. जखमींना डॉ. रवींद्र महाजन यांच्या रुग्णालयात तर काहींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्याया कुत्र्याने परिसरातील चार-पाच बकर्यांनाही चावा घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबिजची विशेष लस द्यावी लागते. येथील ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना बुलडाणा हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत परिसरात पिसाळलेल्या या कुत्र्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बोराखेडी व मोताळा परिसरात सध्या महिला, मुले आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातारवण आहे. मोताळा नगर पंचायत आणि बोराखेडी ग्रामपंचायत प्रशासनाने पिसाळलेल्या या कुत्र्यासोबतच भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
मोताळा-बोराखेडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सात जणांना चावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:46 AM
मोताळा: शहरासह बोराखेडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा-सात जण जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. जखमींना उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बकर्यांनाही जखमी केल्याची माहिती माहिती आहे.
ठळक मुद्देजखमींमध्ये लहान बालकांचाही समावेश