यावेळी आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयराज शिंदे, जिल्हा सरचिटणीस योगेंद्र गोडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष रवींद्र ढाकने, शालिनीताई बुंधे-चौथनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी व फलक झळकावून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक वारे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, योगेश राजपूत, प्रकाश राजगुरे, राजेंद्र पवार, गौरव राठोड, नगरसेवक मंदार अरविंद होंडे, मंदार बाहेकर, महिला जिल्हा सरचिटणीस अलकताई पाठक, सुचिता उमाळे, शिल्पाताई भगत, चंदाताई पुंडे, लताताई तायडे, मायाताई पद्ममने, गणेश पांडे, बाळू ठाकरे, संजय जुंबड, कुलदीप पवार, समाधान मोहिते, भुजंगराव सावळे, अनंता शिंदे, यतीन पाठक, अंकुश भालेराव, सतीश हिंगणे, भारत गव्हाणे, आशिष दोडे, विनायक भाग्यवंत यांसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
--पोलिसांची दडपशाही--
या आंदोलकांवर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून पाळत ठेवून त्यांना एक दिवसापूर्वीच जाणीवपूर्वक सुरक्षित अंतर ठेवण्याची नोटीस बजावली. तसेच आंदोलनकर्त्यांवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची दडपशाही केली. गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जयस्तंभ चौकात केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलकांची संख्या दोनशेच्या वर होती. तरीसुद्धा भर चौकात निषेध व मडके फोडण्याचे आंदोलन छेडण्यात आले. सत्ताधारी पक्षाचे असलेल्या या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.