शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

बुलडाण्यात भाजप-काँग्रेस पदाधिका-यांमध्ये राडा!

By admin | Published: July 12, 2017 7:31 PM

बुलडाणा : सरकारने कर्जमाफी दिली असून, आता आंदोलन करू नका अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून घोषणाबाजी व धक्काबुक्की केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सरकारने कर्जमाफी दिली असून, आता आंदोलन करू नका, तसेच मुंबईप्रमाणेच आदर्श घोटाळा बुलडाण्यात करू नका, अशी मागणी करण्याकरिता जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले व भाजपचे अन्य पदाधिकारी कॉंग्रेस कार्यालयाजवळ गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता.बुधवारी दुपारी १२. ३० ते १ वाजेपर्यंत कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी विरोधात कॉग्रेस पुन्हा राज्यभर एल्गार पुकारणार आहे. या आंदोलनाची सुरूवात बुलडाण्यातून होणार असून, त्याकरिता प्रदेषाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे बुलडाण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्याला काही अवधी असतानाच भाजपच्या नेत्या तथा जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन पवार, शहराध्यक्ष महिला आघाडी विजया राठी काँग्रेस कार्यालयाबाहेर गेल्या. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. तसेच "नरेंद्र मोदी हायहाय", "भाजप सरकार मुर्दाबाद" अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी येवून तणाव निवळला. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी मंगळसुत्र तोडल्याचा आरोप श्वेता महाले यांनी केला आहे.