शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

भाजपकडून जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर स्ट्राईकचा वापर राजकीय स्वार्थासाठी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बुलडाणा येथे केला.

बुलडाणा: सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या युतीकडून जवानांच्या शौर्य व त्यागाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बुलडाणा येथे आयोजित सभेत केला. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी त्यांची बुलडाण्यात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एअर  स्ट्राईकचा राजकीय स्वार्थासाठी होत असलेल्या वापराचा समाचार घेत शरद पवार यांनी म्हणाले की, पाकिस्तानच्या कैदेत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका ही छप्पन इंचाच्या छातीमुळे नव्हे तर जागतिक स्तरावरून पाकिस्तानवर आलेल्या दबावामुळे झाली. मोदी यांचा खरोखरच ऐवढा प्रभाव असले तर पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या महाराष्ट्राच्या कुलभूषण जाधव यांचा शोध घेऊन त्यांची सुटका त्यांनी करावी, असे आव्हानच त्यांनी यावेळी बोलताना केले.जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. आज पाकिस्तान, बांग्लादेशसह काही लगतच्या देशात वारंवार लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न झाला. पण आपला देश आजपर्यंत लोकशाहीच्या चौकटीच्या बाहेर गेला नाही किंवा कोणी तसा प्रयत्न केला नाही. कारण घटनेने दिलेल्या दिशेतंर्गतच राज्यकर्र्त्यांनी कारभार केला. मात्र आज भाजप सत्ताधार्यांकडून वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. दरम्यान, आम्ही सत्तेत आल्यास आॅनलाईन फॉर्म भरून न घेता सरसगट कर्जमाफी व शेतीमाला हमीभावाच्या दीडपटी प्रमाणे किंमत देऊ आणि हे आम्ही यापूर्वी करून दाखवल आहे. ७० हजार कोटींची कर्जमाफी आम्ही दिली आहे. २००९ मधील कर्जमाफीनंतर आपण कृषी मत्री असताना दोन वर्षाच्या आत तांदुळ, गहू आणि कापूस निर्यातीत जगाच्या पहिल्या तीनमध्ये देशाचा समावेश झाला होता. मात्र सत्तेत असलेल्यांनी शेतकर्यांची दुर्दशा केली आहे. बीडनंतर राज्यात बुलडाणा जिल्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये दुसर्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान गुजरात मॉडेलचे २०१४ मध्ये आकर्षण होते. मात्र आज हा व्यक्ती कसा आहे, याची आता सर्वसामान्यांना जाण आली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे संकेत असल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, या प्रचार सभेला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, पीरीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजीद मेनन, आ. ख्वाजा बेग, माजी आ. कृष्णराव इंगळे, दिलीपकुमार सानंदा, आ. राहूल बोंद्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

राफेल प्रकरणाचीही चौकशी करूमहाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकर्यांना सरसगट कर्जमाफी देण्यासोबतच राफेल प्रकरणातही सविस्तर चौकशी करू. गोपनियतेच्या नावाखाली कराराची माहिती देण्यास भाजपक  सरकारकडून विरोध दर्शविल्या गेला. त्याचीच कागदपत्रांची फोटो कॉफी प्रसारमाध्यमामध्ये येते. या उलट बोफोर्स प्रकरणात पारदर्शक चौकशी केल्यानंतर त्यातील सत्य समोर आले होते, असा दावा शरद पवार यांनी करत मोदी सरकारकडून राफेल प्रकरणात केला जाणारा बनाव निश्चितच संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची आम्ही सत्तेत आल्यास निश्चितच चौकशी करू असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019buldhana-pcबुलडाणाSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस