शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

घाटाखाली भाजपचा दबदबा

By admin | Published: February 24, 2017 2:19 AM

खामगाव व जळगाव तालुक्यात शत-प्रतिशत भाजप!

बुलडाणा, दि. २३- बुलडाणा जिल्हा घाटाखाली व घाटावर असा विभागला गेला आहे. भौगोलिक व सामाजिक परिस्थितीही या दोन भागात विभागल्या गेली असून, राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. घाटाखाली आधीच बळकट असलेल्या भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत आपला दबदबा कायम ठेवला. खामगाव तालुक्यातील सात व जळगाव जामोद तालुक्यातील चार जागा जिंकून जि.प.वर झेंडा फडकण्यात घाटाखालच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरली आहे.भाजपचे जिल्ह्यात तीन आमदार असून, ते सर्व घाटाखाली आहेत. घाटावर काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आहेत. जि. प. निवडणुकीची धुरा यावेळी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या खांद्यावर होती. त्यांनी घाटाखाली आ. चैनसुख संचेती व आ. डॉ. संजय कुटे यांच्यासमवेत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. भापजला घाटावर केवळ सहा जागा मिळाल्या असून, उर्वरित १८ जागा घाटाखालीच मिळाल्या, हे येथे उल्लेखनीय! भाजप व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला घाटाखाली अपेक्षित यश मिळाले नाही. शिवसेनेला दहापैकी केवळ एकच जागा घाटाखाली मिळाली, तर उर्वरित नऊ जागा घाटावर मिळाल्या आहेत. काँग्रेसला घाटाखाली १३ पैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. भारिपच्या चारपैकी आता केवळ दोन जागा आहेत. भाजपला जिल्हा परिषदेत सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांना बुलडाणा व लोणार तालुक्यात जिल्हा परिषदेची एकही जागा मिळाली नाही. बुलडाण्यात सहा व लोणार तालुक्यात तीन गट आहेत.