देऊळगावराजा: शहरात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण होते आहे. नगरपालिकेकडून काही उपाययोजना झाल्या नाहीत. एक महिन्यापासून शहराला पाणीपुरवठा नाही तर नगरपालिका प्रशासन निष्क्रिय असून, त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच पाण्याचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करीत भाजपने ९ फेब्रुवारी रोजी शहरातून भव्य मोर्चा काढला. भाजप कार्यकर्ते व नागरिक खाली हांडे, घगरी घेऊन नगर पलिकेवर धडकले. यावेळी शिष्टमंडळाने मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना निवेदन देत शहरातील पाणीटंचाई सोडविण्याबाबत चर्चा केली. तेव्हा १५ दिवसात शहराला पाणी पुरवठा करण्याचे अश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. शहराला एक महिन्यापासून पाणीच नाही, पाण्यासाठी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याला पालीका जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, राजेंद्र टाकळकर, प्रवीण धन्नावत, संचित धन्नावत, अय्युब कोटकर, निशीकांत भावसार, यादव भालेराव, सुदर्शन गीते, अँड. कुलकर्णी, सविता पाटील, डॉ. रामदास शिंदे, उदय छाजेड, डॉ. शंकर तलबे, धर्मराज हनुमंते, संजय तिडके, मयूर पूजारी आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे यांनी सांगितले की, पाण्यासाठी राजकारण करणार नाही, शहराला कसे पाणी देता येईल, याची उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडेच लक्ष वेधले आहे.
पाण्यासाठी भाजपाचा मोर्चा
By admin | Published: February 10, 2016 2:14 AM