चिखली, दि. 0३- 'वन रँक वन पेन्शन' योजना न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर गरेवाल कुटुंबीयांची रुग्णालयात जावून भेट घेण्याचा प्रयत्न करणारे अ.भा.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अटक करून भेट घेण्यास मज्जाव करणे ही हुकूमशाही असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ चिखली काँग्रेसच्यावतीने ३ नोव्हेंबर रोजी भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारचा निषेध तीव्र निषेध करून जोरदार घोषणाबाजी केली. या पश्चात तहसील कार्यालयावर जावून शासनाच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध नोंदविणारे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, दीनदयाळ वाधवाणी, रफिक कुरेशी, नंदकिशोर सवडतकर, रामदास मोरे, विजय गाडेकर, गोकुळ शिंगणे, अमिनखा उस्मानखा, सचिन बोंद्रे, राजू रज्जाक, दीपक खरात, दिनेश भराड, तुषार भावसार, साहेबराव डुकरे, कपील बोंद्रे, हरीश सावजी, राजेश ठेंग, आत्माराम देशमाने, प्रदीप पचेरवाल, दीपक थोरात, प्रशांत देशमुख, पप्पु पाटील, राहुल सवडतकर, किशोर कदम, तुषार बोंद्रे, विलास कंटुले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसकडून भाजपचा निषेध
By admin | Published: November 04, 2016 2:10 AM