लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांबाबत केलेल्या विधानाचा विरोध आणि निषेध अजूनही थांबलेला नाही. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात ते भाजपाच्या एका कार्यक्रमात पोहोचले असता, तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचून ‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा दिल्या, एवढेच नव्हे तर काळे झेंडेसुद्धा दाखवले. पोलिसांनी याप्रकरणी १२ काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली असून, काळे झेंडेसुद्धा जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी नेहमी रडतात साले, असे बळीराजाबद्दल गैर उद्गार काढले होते. यानंतर दानवे हे आज शेगाव येथे भाजपा महिला आघाडीच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित झाले. याची माहिती शेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी दुपारी १२ वा. खामगाव रोडवरील हॉटेल विघ्नहर्ता या कार्यक्रम स्थळी पोहोचून तेथे ‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा दिल्या. शिवाय काळे झेंडेही दाखवले. दरम्यान, दानवेंच्या कार्यक्रमात विघ्न आणण्याबाबत पोलिसांना आधीच सूचना मिळाल्याने पोलिसांनी कार्यक्रम स्थळावर कडक बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना सभा सुरू असलेल्या स्थळापयर्ंत जाता आले नाही.यावेळी ठाणेदार डी.डी.ढाकणे, पीएसआय फटींग, शेख, पोहेकंॅा अरुण खुटाफळे व त्यांच्या पथकाने आंदोलनकर्ते अमित जाधव, अनिल सावळे, डॉ ताहेर, संतोष सानप, सिद्धार्थ वाकोडे, तौसिफ खान, केशव मेंटकर, उमेश हिवराळे, शुभम आजाडीवाल, आकाश पहुरकार आणि त्यांच्या १२ साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून दानवेंचा कार्यक्रम संपेपयर्ंत सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते.
दानवेंना शेगावात दाखविले काळे झेंडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:38 AM
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांबाबत केलेल्या विधानाचा विरोध आणि निषेध अजूनही थांबलेला नाही. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात ते भाजपाच्या एका कार्यक्रमात पोहोचले असता, तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचून ‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा दिल्या, एवढेच नव्हे तर काळे झेंडेसुद्धा दाखवले.
ठळक मुद्दे‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा१२ कार्यकर्ते ताब्यात