बुलडाणा, दि. २२: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निघरुण खुनाला ३६ महिने पूर्ण झाल्यावरही तपास कार्यास गती प्राप्त होत नाही, याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने बुलडाणा शहरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्यां मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे निवेदन देण्यात आले. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या मारेकर्यांची रेखाचित्रे ही राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी, तसेच सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रूद्र पाटील व जयप्रकाश हेगडे या एन.आय.ए.ला हवे असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे एन.आय.ए.च्या वेबसाईटवरील फोटो राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना प्रामुख्याने डॉ.गणेश गायकवाड, प्रा.सुनील देशमुख, मीनल आंबेकर, नरेंद्र लांजेवार, प्रदीप हिवाळे, दत्ताभाऊ सिरसाट, शाहिना पठाण, मृणालीनी सपकाळ, प्रतिभा भुतेकर, अँड. हरिदास उंबरकर, पत्रकार रणजीतसिंग राजपूत, शिवाजी पाटील, राम बारोटे, सुरेश साबळे, सुनील सपकाळ, प्रशांत सोनुने, काशीराम बावस्कर, आकाश दळवी, सुधीर देशमुख, प्रा.डॉ.संतोष आंबेकर, गंगाराम चिंचोले, राजू जाधव, महेंद्र सौभागे, अजय दराखे, प्रशांत शेकोकार, सुरेश धनवे, सुरेश सरकटे, संजिवनी शेळके, अविनाश चव्हाण इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
अंनिसचे पंतप्रधानांना काळे निवेदन
By admin | Published: August 23, 2016 1:48 AM