लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : भरधाव काळी-पिवळी व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात सात प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर आज ४ च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील अत्यावस्थ झालेल्या एकास जळगाव खान्देश तर उपचारास बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, काळी-पिवळी प्रवाशी घेवून मलकापूरकडे निघाली होती. सोलापूर राज्य महामार्गावर मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक विरूध्द दिशेने येणाºया ट्रॅक्टरवर काळी-पिवळी आदळल्याने मोठा अपघात झाला. रात्री ८ वाजेच्या सुमारास समतेचे निळे वादळ संघटना अध्यक्ष भाई अशांत वानखेडे व सहकाºयांनी जखमींना उपजिल्हा रूग्णालयात हलविले.जखमी रूग्णात संदीप लोखंडे (वय ३५)रा.डिडोळा, रमेश शिवाजी वनारे (वय ६०) रा.माकनेर, निनाबाई ब्राम्हंदे (वय ३२) धाड, नंदा रामदास खंडागळे (वय ५५) रूईखेड, जगदेव खंडागळे (वय ६५) रूईखेड, कुसुम राजू परमेश्वर (वय २८) धाड, लक्ष्मी गजानन काचकुळे (वय २८) नांद्रा कोळी अशी जखमींची नावे आहेत. त्यापैकी रमेश वनारे ह्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जळगाव खान्देश येथे तर संदीप लोखंडे यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. रूग्णालयात व्यवस्था नाही तरीही वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश बेन, सेविका आशाबाई खरात, रमा बोहरी, पुनम साबळे, कोलारकर या अधिकारी व कर्मचाºयांनी उपचारासाठी मेहनत घेतली. इतर जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर काळी-पिवळी व ट्रॅक्टरचा अपघात; सात गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:08 PM
भरधाव काळी-पिवळी व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात सात प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर आज ४ च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील अत्यावस्थ झालेल्या एकास जळगाव खान्देश तर उपचारास बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.
ठळक मुद्देसोमवार, ४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता निंबारी फाट्याजवळ घडली दुर्घटनाअत्यावस्थ असलेल्या एकावर जळगाच येथे, तर दुस-याव बुलडाणा येथे उपचार सुरू