लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: जवळच असलेल्या ग्राम लोणीगवळी येथे विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचार्यास बाहेर काढून उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करून खिडकीच्या काचा फोडल्याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.लोणी गवळी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर यंत्रचालक संतोष दामोधर डोंबळे हे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजताच्या दरम्यान कर्तव्यावर असताना आरोपी राजू सदाशिव चंदनशिव रा. भोसा व शंकर दगडू सौभागे रा. लोणीगवळी हे उपकेंद्रावर आले व संतोष डोंबळे यांना आमच्या गावची वीज नेहमी राहत नाही, वारंवार डीपी जळते याचे कारण काय, तुम्ही पॉवर हाऊसच्या बाहेर निघा, आम्हाला वीज बंद करायची आहे, असे म्हणून संतोष डोंबळे यांना बाहेर काढले व उपकेंद्रातील प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन कोणीतरी बटण दाबून वीजपुरवठा खंडित केला व नियंत्रण कक्षाच्या तीन खिडक्यांच्या काचा फोडून उपकेंद्राचे ८ हजार रुपयांचे नुकसान केले. सदर बाब वरिष्ठ अधिकारी दीपक मालोकार व बुगदाणे यांना कळविताच त्यांनी आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी मालोकार यांचे न ऐकता त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार ३ सप्टेंबर रोजी संतोष दामोधर डोंबळे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला कलम ३५३, ५0४, ५0६, ३४ भादंवि व कलम ३ पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एएसआय झोरे करीत आहेत.
विद्युत उपकेंद्राच्या काचा फोडल्या; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:46 AM
डोणगाव: जवळच असलेल्या ग्राम लोणीगवळी येथे विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचार्यास बाहेर काढून उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करून खिडकीच्या काचा फोडल्याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देकर्मचार्यास बाहेर काढून प्रथम खंडित केला विद्युत पुरवठा ग्राम लोणीगवळी येथील घटना