- सुहास वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : लॉकडाऊनच्या काळात एक वयोवृद्ध भिक्षा मागणारी दृष्टीने अधू झालेल्या महिलेच्या डोळ्याची शस्त्रक्रीया करून तीला नवी दृष्टी दिली. त्यामुळे ही रंगबिरंगी दुनिया पुन्हा या वृद्ध महिलेस पहावयास मिळत आहे. जळगाव खांदेश जिल्ह्यातील बोदवड परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या आत्मसन्मान फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिच्या डोळ्याची मोफत शस्त्रक्रिया स्थानिक नेत्रालयाच्या सहकार्याने केली.घरोघरी फिरत असताना दिसत नसल्याने ही वृध्द महिला नालीत पडली होती. ही बाब आत्मसम्मान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी प्राथमिक तपासणी साठी बोदवड मधील नेत्र तपासणी सेंटर येथे त्यांच्या डोळ्याची तपासणी केली. तिथून शस्रक्रियेसाठी नांदुरा नेत्रालय येथे पाठवण्यात आले. तेथे मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी डॉक्टरांनी व येथील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. जेवण, राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.याबाबत नेत्रालयाचे चेअरमन व कर्मचाऱ्यांनी अशा असहाय्य व्यक्तींची मदत करण्याचा उद्देश यानिमित्ताने सफल झाल्याची भावना व्यक्त केली. यापुढेही ही कामे करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
आजीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंद शस्रक्रियेनंतर त्या महिलेला दिसू लागले. आता त्या कुणाचाही आधार न घेता चालू शकतात. नवीन दृष्टी मिळाल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा आहे. याबाबत मोहनराव नारायणा नेत्रालयाचे चेयरमन म्हणाले वृद्धेला नेत्रालयात आणले तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हते, शस्रक्रियेनंतर आजीच्या चेहऱ्यावरील आनंद व हास्य पाहून आनंद झाला. आजींना पुन्हा दृष्टी मिळून देण्यासाठी मोहनराव नारायणा नेत्रालयाची टीम व आत्मसम्मानच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.