मेहकर : दरवर्षीप्रमाणे यावेळीही महाराष्ट्र अर्बन व जगदंबा ग्रुप अंजनी बुद्रूकच्या वतीने महाराष्ट्र अर्बनच्या परिसरात रक्तदान शिबिर व मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता. या शिबिरात एकूण १६१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष ऋषिकेश जाधव, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, गणपतराव रहाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबनराव तुपे, राजू जयस्वाल, दिवाकर मेहकरकर, केशव पटेल, दिलीप सुर्वे, गजानन देशमुख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी १० ते ४ पर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात एकूण १६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामध्ये महिलांचे योगदान ही मोठ्या प्रमाणावर दिसून आले. यावेळी महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक अजय उमाळकर यांना खा. प्रतापराव जाधव मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. रक्त संकलनासाठी डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दत्ताजी भाले रक्त केंद्रातील डॉ. कृष्णा कुलकर्णी, अजित काळे, गजानन वाघ, रेवती जोशी, वर्षा घुमरे, तुषार खंडागळे, विजय पैठणकर, शिवानी देशमुख, ललिता नादरकर, प्रकाश हाके आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी बुलडाणा अर्बन व जगदंबा ग्रुपचे सदस्यांनी प्रयत्न केले. यावेळी मास्क, सॅनिटायझरचेही वाटप उपस्थितांना करण्यात आले.