कोरोनासोबत सुरू असलेल्या या लढ्यात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पुढे येत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळून देण्यासह रेमडेसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा, जेवण, औषधी यांची व्यवस्था तसेच विविध सामाजिक कामांसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. देऊळगाव राजामध्ये "कृषी उत्पन्न बाजार समिती, सभागृह" येथे शिबिर घेण्यात आले़ सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले़ सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ३५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी पवन लाटे, निखिल अशोकराव देशमुख, सुदाम कव्हळे, निलेश तांगडे, डाॅ. रामप्रसाद शेळके, डॉ. रामदास शिंदे, श्रीकांत कोल्हे, रावसाहेब कोल्हे, काकासाहेब कव्हळे, गणेश कव्हळे, कार्तिक सुदाम कव्हळे, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मराठा प्रवीण व कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले़
रक्तदान शिबिरात ३५ युवकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:36 AM