शिबिरात आराधना ब्लड बँक, बुलडाणा येथील डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक येथे दाखल झाले होते. दरम्यान, परिचारिका दिनाचे औचित्य साधत मनोज दांडगे यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना २ लाख रुपयांचा विमा, सॅनिटायझर, एन ९५ मास्क देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज दांडगे, नीलेश देठे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, बुलढाणा. विजय धंदर, निर्मला तायडे, गजानन पालकर, पांडुरंग पवार, समाधान फुसे, प्राचार्य संतोष डवले, जगन कानडजे, नीलेश हिवाळे, सागर हिवाळे, रामेश्वर पाटील, महेश हिवाळे, रमेश तायडे, मनोहर तायडे, विजय तायडे, अमोल माळोदे, अमोल जाधव, प्रवीण चव्हाण, प्रफुल्ल हिवाळे, राहुल शिवणकर, रवी गेंदे, गोपाळ तायडे, विलास पवार, विनोद गायकी, राहुल गुळवे, विजय तायडे, सांडू पवार, विनोद तायडे, गणेश तायडे यांची उपस्थिती होती.