कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील एम.एस. सी. नर्सिंगचे प्रवीण शिंगणे हे उपस्थित होते. शिंगणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदानाविषयी जनजागृती महत्त्वाची आहे. याप्रसंगी त्यांनी रक्तदानाविषयी सर्वेक्षण केले. कर्मचाऱ्यांकडून प्रश्नावली भरून घेतल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आर. लाहोरकर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये रक्तदान जनजागृतीसंबंधी माहिती दिली. हा कार्यक्रम एन.एस.एस. विभाग व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ.आर. जी. सुरळकर, प्रा.बी. डब्ल्यू सोमटकर, प्रा.एस. टी. कुटे, प्रा.एस. एम. पवार, प्रा.व्ही. आर. मोरे, प्रा.डॉ. जैतालकर, संतोष फलटणकर, प्रताप पाटील, रमेश पसरटे, मालता डाखोरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. एम. आर. शिंदे यांनी केले. आभार प्रा.डॉ. एस. एम. खडसे यांनी मानले.
रक्तदान जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:32 AM