गत काही वर्षांपासून चिखलीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. या पृष्ठभूमीवर यंदाही शहरातील सर्वस्तरातील नागरिकांचा समावेश असलेल्या शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केल्याने शहरात शिवजयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रम संचारबंदीच्या नियमास अधीन राहून पार पाडले जाणार आहेत. या पृष्ठभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरदेखील फिजिकल डिस्टन्सिंग व योग्य खबरदारीने घेण्यात आले. या शिबिरात २०७ शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या शिबिरात महिलांनी देखील रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी जीवनधारा ब्लड बँक बुलडाणा आणि सामान्य रुग्णालय खामगाव या दोन रक्तपेढ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, शिबिरस्थळी शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटपदेखील करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:38 AM