या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाठे हाेते. प्रमुख अतिथी संस्था सचिव डॉ. अजिंक्य पाटील, तर उद्घाटक म्हणून चव्हाण पॅरामेडिकल कॉलेजचे अध्यक्ष अमोल चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास टाले यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, दत्तकग्राम येळगाव येथील ग्रामस्थ, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आणि पॅरामेडिकल कॉलेजचे बहुसंख्य विद्यार्थी यांनी आपली रक्तगट तपासणी करून घेतली. संचालन शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. मनोज व्यवहारे, तर राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. आरती खडतकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
कला महाविद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:14 AM