--पालिकेतर्फे स्मशानभूमीत सफाई--
बुलडाणा पालिकेतर्फे संगम तलावस्थित स्मशानभूमीची ६ ते ८ मे दरम्यान सफाई करण्यात आली. त्यावेळी पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडेंसह पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत हजेरी लावून येथे सफाई केली. अग्निशामक दलाच्या पथकानेही स्मशानभूमीत पाणी मारून सफाई करण्यात आली.
--आ. गायकवाडांनीही केले होते रक्षाविसर्जन--
पहिल्या लाटेदरम्यान मृत व्यक्तीची रक्षाच नातेवाईक नेत नव्हते. तेव्हा बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत येऊन तेथील रक्षा व अस्थी सोबत घेत त्याचे आदरपूर्वक विसर्जन केले होते.
--काय म्हणतात स्मशान जोगी--
१) अंत्यसंस्कारासाठी मोजकेच व्यक्ती येतात. रक्षा नेण्यासाठीही तुरळक व्यक्ती येतात. पूर्वीप्रमाणे रक्षा उचलून त्याचे विसर्जन होत नाही. अपवादात्मक स्थितीत मृताचे नातेवाईक येऊन रक्षा व अस्थी घेऊन जात आहेत.
(शंकर गायकवाड, स्मशान जोगी, बुलडाणा)
२) स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा कमी पडत आहे. शेडपाडून दूर अंतरापर्यंत आता पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. कोरोनामुळे सध्या फारच विपरीत परिस्थिती झाली आहे. फारच तुरळक प्रमाणात रक्षा विसर्जनासाठी काही जण घेऊन जातात.
(रामा, स्मशानजोगी, बुलडाणा)