शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दुसऱ्या लाटेचा फटका, तिसरीबाबत हवे गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:33 AM

बुलडाणा : जिल्ह्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला असून बाधितांचे प्रमाणही पहिल्या लाटेच्या तुलनेत पाच वाढले असून तब्बल ...

बुलडाणा : जिल्ह्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला असून बाधितांचे प्रमाणही पहिल्या लाटेच्या तुलनेत पाच वाढले असून तब्बल ३६२ जणांचा कोरोनामुळे अवघ्या साडेचार महिन्यात मृत्यू झाला आहे. परिणामस्वरूप तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासकीय पातळीवरही आता ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.

पहिल्या लाटेदरम्यान मुकाबल्यासाठी फारशी पूर्वतयारी करण्यास वेळ मिळाला नसला तरी दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यात बऱ्याच अंशी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतरही या लाटेचा जिल्ह्याला फटका बसला आहे. जर ही सुविधाही दुसऱ्या लाटेदरम्यान उपलब्ध नसती तर चित्र अधिक विदारक दिसले असते. मात्र दुसऱ्या लाटेची चाहूल लागताच प्रशासकीय पातळीवर पायाभूत सुविधा, दोन ऑक्सिजन प्लांट आणि दीड हजार ऑक्सिजन बेड, ४२६ ऑक्सिजनयुक्त व्हेंटिलेटर बेड जिल्ह्यात उभारण्यात आल्यामुळे या दुसऱ्या लाटेत बऱ्यापैकी जिल्ह्याने तग धरला, ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे आता संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासकीय पातळीवरही जिल्ह्यात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्याची अवश्यकता आहे.

--कोट--

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य विभागाने पू‌र्वतयारी सुरू केली असून जिल्ह्यात पाच ठिकाणी ऑक्सिनज प्लांट येत्या काळात कार्यान्वित होत आहेत. बुलडाणा येथे दोन प्लांट सध्या सुरू आहेत. ऑक्सिजन बेडही ही वाढविण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये प्रसंगी कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्या इलाजासाठी कोविड समर्पित रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून खासगी व शासकीय बालरोगतज्ज्ञांचे एक पथक गठित करण्यात येत आहे.

(डॉ. प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक)

--मार्च ते डिसेंबर २०२०--

पॉझिटिव्ह रुग्ण:- १२,५१८

पॉझिटिव्हिटी रेट:- ११.७१ टक्के

बरे झालेले रुग्ण:- १२,१४८

मृत्यू:- १५१

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण:- (९७ टक्के)

संदिग्धांच्या चाचण्या :- १,०६,८२२ (२१ टक्के)

--जाने. ते मे २०२१--

पॉझिटिव्ह रुग्ण:- ६५,३९८

पॉझिटिव्हिटी रेट:-१६.४६ टक्के

बरे झालेले रुग्ण:- ५९,४४४

मृत्यू:- ३६२

संदिग्धांच्या चाचण्या:- ३,९७,३०८ (७९ टक्के)

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण:- ९०.८९

--आजपर्यंतची स्थिती--

पॉझिटिव्ह रुग्ण:- ७७,९१६

पॉझिटिव्हिटी रेट:- १५.४६ टक्के

बरे झालेेले रुग्ण:- ७१,५८४

मृत्यू:- ५१३

एकूण संदिग्धांच्या चाचण्या:- ५,०४,१३०

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण:- ९१.८७ टक्के

--पायाभूत सुविधांसाठी ६८ कोटी--

गेल्या १४ महिन्यात कोरोनाच्या संदर्भाने पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्याला विविध योजनांमधून आतापर्यंत ६८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी जवळपास ५२ कोटी रुपायंचा खर्च गेल्या आर्थिक वर्षात झालेला आहे. टेस्टिंग किट ते ऑक्सिजन प्लांटपर्यंतच्या बाबींचा यात समावेश आहे. यासोबतच चालू आर्थिक वर्षात ८ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेले आहे. सोबतच जिल्ह्यातील सातही आमदारांच्या निधीमधून सात कोटी रुपये एप्रिल महिन्यातच नियोजन विभागाकडे जमा झाले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी निधीही उपलब्ध झालेला आहे.