लोकमत न्यूज नेटवर्कवानखेड : धुरा व शेतातील पालापाचोळा जाळण्याच्या कामातून वृक्षतोडीचे प्रमाण परिसरात वाढले आहे. वानखेड ते वानखेड फाटा ह्या ३ कि.मी. अंतराच्या रस्त्यालगत दुतर्फा लावण्यात आलेले अनेक मोठे वृक्ष या प्रकारामुळे नष्ट झाले आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वानखेड ते वानखेड फाटा या रोडवर टुनकी रस्त्यालगत सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून कडूनिंब, बाभूळ व इतर लावण्यात आलेले वृक्ष मोठे झाले आहेत. परंतु या महिन्यात रस्त्यावरील पालापाचोळा पेटवून देण्याच्या नावाखाली चक्क मोठ्या झाडांचे बुंधे पेटवून त्यांना नष्ट करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रस्त्याचे सुशोभीकरण व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शासनाच्यावतीने दरवर्षी रस्त्यालगत किंवा आजूबाजूला वृक्ष लागवड केली जाऊन त्यांचे संगोपनासाठी लाखो रूपये खर्च केल्या जातात. परंतु परिसरात झाडांचे बुंध्याशी पालापाचोळा जाळला जाऊन वृक्षतोड केली जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बुंधा पेटवून झाडे तोडण्याचा सपाटा!
By admin | Published: May 29, 2017 12:03 AM