मलकापूर : तब्बल तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर नाल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या त्या ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह घटनास्थळापासून तब्बल दहा ते अकरा किलोमीटर वर मालेगाव रणगाव शिवारातील व्याघ्रा नदीच्या पात्रात १४ जून रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रेस्क्यु टीमने शोधून काढला.११ जुन रोजी रात्री ११ वा वाजताच्या दरम्यान अनंत विरसेन पाटील या. जांबुळधाबा हे आपल्या शेतातुन मोटारसायकल ने घरी परतानाा शेत नाल्याला आलेल्या पुरात मोटारसायकल सह वाहून गेले होते. मात्र गावाजवळ मोटारसायकल अडकली ती दुसºया दिवशी शोधकार्या दरम्यान सापडली. तर नाल्याचे मोठया प्रमाणात खोलीकरण झाले असल्याने अनंत पाटील हे पुढे वाहुन गेल्याची शक्यता असल्याची माहीती नातेवाइकांच्या सांगण्यावरून तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी १२ जून रोजी रात्री पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. तात्काळ सर्च आॅपरेशनसाठी येण्याचे सूचित केले. त्यावरून १३ जून रोजी दुपारी पथकाची रेस्क्यु टीम आणि आपात्कालीन वाहन व सर्च आॅपरेशन साहीत्यासह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे जवान सागर आटेकर, अंकुश सदाफळे, सुरज ठाकुर, अजय जाधव, ऋषीकेश तायडे, मयुर कळसकार, मयुर सळेदार, गोविंदा ढोके, गोकुळ तायडे, हे घटनास्थळी पोहचले. उशिरा पर्यंत ५ की.मी.पर्यंत सर्च आॅपरेशन राबविण्यात आले परंतु अनंत पाटील यांचा शोध लागला नाही. दमºयान, १४ जून रोजी सकाळी पुन्हा ८ वाजता (डीप सर्च आॅपरेशन, आणी टीम स्पेस आॅपरेशन) हे तीव्र केले.अखेर घटनास्थळापासुन १० ते ११ की.मी.च्या अंतरावर भालेगाव रणगाव नजिक असलेल्या व्याग्रानदी पात्रात रविवारी दुपारी अनंत यांचा मृतदेह शोधुन बाहेर काढला. (प्रतिनिधी)
अखेर पुरात वाहुन गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:45 PM