नांदुरा : तालुक्यातील निंबोळा देवी येथे गणपती विसर्जन पाहण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या अक्षय संदीप वानखेडे (वय १८ वर्षे रा. शिरसोळी ता.नांदुरा) हा युवक १९ सप्टेंबर रोजी दुपारी पाय घसरून नदी पात्रात पडून बुडाला होता . संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक अकोला यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी अंडर वाॅटर स्विमिंग ने सर्च ऑपरेशन राबवुन २५ फुट खोल पाण्यातील अक्षय वानखडे याचा मृतदेह शोधुन बाहेर काढला.
नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी संस्थान च्या मागे विश्वगंगा नदी पात्रात १९ सप्टेंबरच्या दुपारपासून गणपती विसर्जन सुरू होते. यामध्ये अक्षय संदीप वानखेडे वय १८ वर्षे रा. शिरसोळी ता.नांदुरा हा युवक विसर्जन पाहण्यासाठी गेला असताना नदीपात्रात पाय घसरून तो बुडाला होता . परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न करून शोधकार्य चालविले होते . नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी तात्काळ मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार, उमेश बिल्लेवार,अंकुश सदाफळे,सतीश मुंडाले, ऋषीकेश राखोंडे,राहुल जवके,अंकुश चांभारे, संकेत देशमुखआणी शोध व बचाव साहीत्यासह दि.२० सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहचले तेव्हा येथे बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या सह टीम व बुलढाणा पोलीस पथक व रेस्क्युबोट हजर होती.यावेळी दोन्ही टीम मिळुन एक तास सर्च ऑपरेशन राबविण्यात आले परंतु काही मिळुन आले नाही.अंधार होत असल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबविले .नंतर २१ सप्टेंबर रोजी सकाळीच तहसीलदार राहुल तायडे सर यांच्या आदेशाने जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांच्या सहका-यांनी सकाळीच अंडर वाॅटर स्विमिंग सर्च ऑपरेशन चालु केले तेव्हा लगेच तळाशी असलेला अक्षयचा मृतदेह वर आणला, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.