लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : एका २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची घटना मेंढळी (ता. नांदुरा) शिवारात मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सदर तरुणाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.पोलीस सूत्रांनुसार, बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मेंढळी ता. नांदुरा येथील अमोल मधुकर झांबरे (२७) याच्या मामाचे मेंढळी शिवारात शेत आहे. तेथे अमोलचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मंगळवारी आढळला. एसडीपीओ बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मृताचा भाऊ शरद मधुकर झांबरेच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. दरम्यान, प्रेमप्रकरणातून अमोलचा घातपात झाला असण्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केली. तपास एपीआय दीपक वळवी आणि रामदास वाढे करीत आहेत.
मेंढळी शिवारात तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:19 IST
एका २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची घटना मेंढळी (ता. नांदुरा) शिवारात मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सदर तरुणाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.
मेंढळी शिवारात तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला!
ठळक मुद्देमेंढळी शिवारातील घटना; घातपाताचा संशय