शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

बोंडअळी व्यवस्थापन: शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:36 PM

खामगाव : कपाशी पिकावर बोंडअळीचा  प्रादुर्भाव होवू नये, यासाठी खामगाव कृषी विभाग कामाला लागला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषीविभागाने कालबध्द कार्यक्रम आखला असून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकरी बांधवांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी कपाशी पेरणीपासुनच शेतकऱ्यांसह कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणासाठी सज्ज ...

ठळक मुद्देयावर्षी कपाशी पेरणीपासुनच शेतकऱ्यांसह कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणासाठी सज्ज झाले आहेत.कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणाकरीता विविध उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत. कृषी अधिकारी बोंडअळी नियंत्रणासाठी तसेच  शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत.

खामगाव: कपाशी पिकावर बोंडअळीचा  प्रादुर्भाव होवू नये, यासाठी खामगाव कृषी विभाग कामाला लागला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषीविभागाने कालबध्द कार्यक्रम आखला असून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकरी बांधवांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी कपाशी पेरणीपासुनच शेतकऱ्यांसह कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणासाठी सज्ज झाले आहेत. हातातोंडासी आलेला घास बोंडअळीमुळे हिरावून घेतल्या जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागील वर्षी बी.टी. कपाशीचे तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  त्यामुळेच शेतकºयांसह कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणाकरीता विविध उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत.तालुका कृषी अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी बोंडअळी नियंत्रणासाठी तसेच  शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. मागीलवर्षी सारखी  परिस्थिती  निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. (प्रतिनिधीनुकसान भरपाई तोकडी मागील वर्षी बोंडअळीने नुकसान झाल्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. सध्या हेक्टरी ६ हजार ८०० रूपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. सदर नुकसान भरपाई तोकडी असल्याने उपाययोजना करण्यावरच शेतकरी भर देत आहेत.

शेतकºयांनी प्रति एकरी ५ कामगंध सापळे लावावे. फुलोर अवस्थेतील कपाशी पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी. जेणे करून बोंडअळी नियंत्रणात राहील.   -  एस.पी.पवार,  तालुका कृषी अधिकारी,  खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती